1.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी | तेणें मुक्तीचारी साधियेल्या ||
2.
एक तत्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥
3.
जाणीव नेणीव भगवंती नाहीं । हरि उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥
4.
जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वाघटीं राम भावशुध्द ॥
5.
काळ वेळ नाम उच्चारिता नाही । दोन्ही पक्ष पाही उद्धरती ॥
6.
नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ॥
7.
नित्य नेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥
8.
सर्व सुख गोडी सर्व शास्त्रे निवडी । रिकामा अर्धघडी राहू नको ॥
9.
सात पांच तीन दशकांचा मेळा । एकतत्त्वीं कळा दावी हरी ॥
10.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥
11.
वेद शास्त्र पुराण श्रुतीचे वचन । एक नारायण सार जप ॥





